शरद पवारांसह आरोग्य मंत्री राजेश टोपे सोलापूर दौऱ्यावर, कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

  • सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन हा दौरा होत असल्याचे बोलले जात आहे. त्यांनीच या दौऱ्याचे नियोजन केले आहे. शरद पवार बारामती मधील गोविंद बाग निवासस्थानाहून सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालक मंत्री दत्तात्रय भरणे देखील आहेत. ते सोलापूरच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही अधिक उपाययोजना करण्याच्या सुचना देतील. यामुळे सोलापूर वासियांचे लक्ष पवरांच्या दौऱ्यावर लागले आहे.

सोलापूर – राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यांतील सीमाही बंद आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न चालू आहेत. त्यातच सर्व नेते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर गेले आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील त्यांच्या सोबत आहेत तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित आहेत. 

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन हा दौरा होत असल्याचे बोलले जात आहे. त्यांनीच या दौऱ्याचे नियोजन केले आहे. शरद पवार बारामती मधील गोविंद बाग निवासस्थानाहून सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालक मंत्री दत्तात्रय भरणे देखील आहेत. ते सोलापूरच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही अधिक उपाययोजना करण्याच्या सुचना देतील. यामुळे सोलापूर वासियांचे लक्ष पवरांच्या दौऱ्यावर लागले आहे. 

सोलापुरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे १० दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा तिसराच दिवस आहे. सोलापूरात एक लाख लोकांची अँटीजन रॅपिड टेस्ट करणार आहेत. सोलापूरमध्ये कोरोनाचा एकूण आकडा ४ हजार ९४१ आहे. त्यातील काही ग्रामीण तर काही शहरी भागात आहेत. तसेच कोरोनामुळे ३५९ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. सोलापूरमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.