Corona-death

वडील वसंतराव माने व मावशी जया घोरपडे यांच्यावर सांगोल्यात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान ५ मे रोजी मावशी जया घोरपडे तर ६ मे रोजी वडील वसंतराव माने या दोघांचेही निधन झाले. प्रमोदची आई शशिकला माने, पत्नी व मुलावरही उपचार चालू होते. मात्र गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देताना शुक्रवार ७ मे रोजी आई शशिकला माने यांचाही मृत्यू झाल्याने डॉ. प्रवीण माने व प्रशांत माने कुटुंब नि:शब्द झाले आहे. दरम्यान, प्रमोद माने यांची पत्नी व मुलगा कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

    सांगोला : घेरडी ता संगोला येथील माने कुटुंबातील आई, वडील, मुलगा व मावशी असा चौघांचा सलग चार दिवसांत कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना कोरोना ट्रेसिंगचे काम लावणाऱ्या प्रशासनाने त्यांच्या सुरक्षितेचि काय दाखल घेतली?असा प्रश्न उपस्थित होत असून ऑक्सिजन बेड न मिळाल्याने एका कोरोना योध्याचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. घरातील कर्ती माणसं गेल्याने माने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सांगोला तालुक्यातुन याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

    घेरडी येथील प्राथमिक शिक्षक प्रमोद वसंतराव माने हे घेरडी अंतर्गत जगधने वस्ती येथे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. मागील दोन महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असणारे माने गुरुजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी ड्यूटीवर गेले होते. मतदान प्रक्रियेचे काम संपवून घरी आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांना त्रास जाणवू लागला. सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी दुखणे अंगावर काढून गावातच उपचार घेतले.त्रास जास्त जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्यात त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबाची धावाधाव सुरू झाली आणि त्यांना सांगोल्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र संसर्ग अधिकच बळावल्यामुळे त्यांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. त्यांचे बंधू डाॅ. प्रवीण माने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला येथे उपचार सुरू केले.परंतु या ठिकाणी खूप प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटी प्रमोद माने यांचा ४ मे रोजी मृत्यू झाला. घरातील कर्ता माणूस गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.दैव एवढ्यावरच थांबले नाही. प्रमोदच्या संपर्कामुळे घरातील वडील सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव माने, आई शशिकला वसंतराव माने, मावशी जया घोरपडे व प्रमोदची पत्नी, मुलगा असे पाच जण एकाच वेळी कोरोनाबाधित झाले.वडील वसंतराव माने व मावशी जया घोरपडे यांच्यावर सांगोल्यात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान ५ मे रोजी मावशी जया घोरपडे तर ६ मे रोजी वडील वसंतराव माने या दोघांचेही निधन झाले. प्रमोदची आई शशिकला माने, पत्नी व मुलावरही उपचार चालू होते. मात्र गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देताना शुक्रवार ७ मे रोजी आई शशिकला माने यांचाही मृत्यू झाल्याने डॉ. प्रवीण माने व प्रशांत माने कुटुंब नि:शब्द झाले आहे. दरम्यान, प्रमोद माने यांची पत्नी व मुलगा कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.