माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणणे राबवा, नाही तर माझ्याशी गाठ..! ; सीईओ स्वामी यांचा अधिकाऱ्यांना इशारा

सोलापूर जिल्हयात माझी वसुंधरा हे अभियान १७ ग्रामपंचायतीमध्ये प्रभावीपणे राबवा. या गावात सर्व योजनांचे अभिसरण करण्यात यावे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात येणार आहेत. अभ्यागता साठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा देणेत येणार आहेत.

    सोलापूर : माझी वसुंधरा अभियान प्रभावी पणे राबवा. १७ ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे योजना राबविली नाही तर माझ्याशी गाठ आहे. असा सज्जड इशारा आज सिईओ दिलीप स्वामी यांनी आज दिला.

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पंचायत यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशीधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी डी शेलार, उत्तर सोलापूरचा गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

    सोलापूर जिल्हयात माझी वसुंधरा हे अभियान १७ ग्रामपंचायतीमध्ये प्रभावीपणे राबवा. या गावात सर्व योजनांचे अभिसरण करण्यात यावे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात येणार आहेत. अभ्यागता साठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा देणेत येणार आहेत. गाव हिरवेगार करा. झाडांना ठिबक सिंचन करा. माझी वसुंधरा अभियानात झाडे लावा, शाळा स्वच्छ सुंदर करा. अंगणवाडी मध्ये पोषण आहार सप्ताह राबवा. तुम्ही सर्वजण या जिल्ह्यातील आहात. येथेच नोकरी करीत आहात. या भुमीत काम करीत असताना आपण चांगल्या सुविधा द्या. या ग्रामपंचायती गुणांकनामध्ये कमी पडलेस सरपंचासह विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना जबाबदार धरणार असल्याचे सिईओ स्वामी यांनी सांगितले.

    जिल्हा स्तरावर समिती – शेळकंदे
    जिल्हा स्तरावर माझी वसुंधरा अभियाना बाबत जिल्हा स्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले. कामात हालगर्जीपण चालणार नसल्याचे शेळकंदे यांनी सांगितले.