करमाळा तालुक्यात भावानेच केला भावाचा खून

करमाळा – करमाळा तालुक्यात शनिवारी रात्री चुलत भावाने आपल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मासेमारीमुळे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यामध्ये मासेमारीचा वाद चालत होता.

परंतु काल शनिवारी रात्री त्यांचा वाद शिगेला पोहोचला. त्यामुळे या वादातून चुलत भावानेच आपल्या भावाचा खून केला.  दरम्यान,पोलिसांना या गंभीर प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हाची नोंद केली आहे.