दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे

कोरोना आपत्ती काळात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे भरीव योगदान आहे. सातत्याने प्रशासकीया बैठका घेऊन भरघोस निधी जिल्हयाला उपलबध्द केला. प्रभावी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेमूळे शहर जिल्हयात कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे धनगर समाज बांधवांचे म्हणणे आहे.

    सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनाथ धनगर समाज बांधव आक्रमक पावित्र्यात दिसून येत आहे. पालकमंञीबदलाचे वारे वाहत असताना जिल्हयातील गाव पातळीवर धनगर समाज एकवटला जात आहे.

    कोरोना आपत्ती काळात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे भरीव योगदान आहे. सातत्याने प्रशासकीया बैठका घेऊन भरघोस निधी जिल्हयाला उपलबध्द केला. प्रभावी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेमूळे शहर जिल्हयात कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे धनगर समाज बांधवांचे म्हणणे आहे.उजनीच्या पाण्यावरून राजकीय कूरघोड्या सुरु आहेत. पालकमंत्री बदलाचे बोलले जात आहे. जर पालकमंत्री बदल केल्यास जन आंदोलन उभे करु असा इशारा जिल्हा परिषद कृषी सभापती अनिल मोटे यांनी दिला आहे.

    अनिल मोटे सभापती कृषी पशूसंवर्धन समिती जिल्हा परिषद सोलापूर

    याबाबत सभापती मोटे म्हणाले की, पालकमंत्री भरणे यांचे काम लोकहितकारक आहे. राजकीय स्वार्थापोटी भरणे यांना बदनाम करण्यात येत आहे. पालकमंत्री यांच्या पाठीशी संपूर्ण धनगर समाज बांधव एकवटला आहे. राजकीय द्वेषा पोटी पालकमंत्री बदलल्यास जनआंदोलन उभे करू असा इशारा ही सभापती मोटे यांनी यावेळी दिला.