गेल्या २४ तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त ‘इतके’ नवे रुग्ण आढळले

सोलापूरमध्ये गेल्या २४ तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजार १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच १ लाख ४७ हजार २९९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच जिल्ह्यात तब्बल ४ हजार १३६ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    सोलापूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु, हळूहळू महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता कमी होत असताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून विविध भागांमध्ये नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर शहरात मागच्या महिन्यापासून कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडाही वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. परंतु, आता हा आकडा कमी होत असताना पाहायला मिळत आहे.

    दरम्यान सोलापूरमध्ये गेल्या २४ तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजार १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच १ लाख ४७ हजार २९९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच जिल्ह्यात तब्बल ४ हजार १३६ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    तसेचं सोलापूर शहरात दिवसभरात फक्त १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये ३३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात २४ तासात १८ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी होत असल्याने प्रशासनाची चिता कमी झाली आहे.