Shiv Sena taught a good lesson to BJP's Hindutva; Sushilkumar Shinde targets BJP

1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबिरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालली आहे. आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, याबाबत शंका आहे अशी खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

    इंदापूर : देशातील ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ अशी ओळख असलेल्या काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती, पण आता ती आहे की नाही, हे माहित नाही, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी इंदापूर येथील कार्यक्रमात बोलत होते. सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

    1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबिरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालली आहे. आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, याबाबत शंका आहे अशी खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

    गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज व्यक्त केली होती. तर दुसरीकडे राज्य पातळीवर महाविकासआघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख नक्की कोणत्या दिशेने होता, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.