प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

बॅग पळवून नेणाऱ्या आमदाराच्या कर्मचाऱ्याला पकडले

    सोलापूर : मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार नीलय डागा यांच्या सोलापूरातील चिंचोली एमआयडीसी येथील ऑईल (खादय तेल) कंपनीवर केंद्रीय आयकर विभागाने छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेल्या माहीती नुसार आमदार डागा यांच्या देशभरातील कंपन्यांवर छापा टाकण्यात येत आहे. मध्य प्रदेश,गुजरात ,राजस्थान ,आशा अनेक राज्यात ऑईल कंपन्या आहेत.करभरणा टाळण्यासाठी ऑनलाईन बँकींग व्यवहार करण्या ऐवजी त्यांनी रोखीने आर्थिक व्यवहार केल्याची प्राथमिक माहीती तपासात समोर आली आहे.

    आ.डागा यांच्या सोलापूरातील घरातून साडेसात कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. याच दरम्यान आमदाराचा एक कर्मचारी बॅग घेऊन पळून जात असताना आयकर विभागाने पकडले आहे.आ. डागा यांच्या देशभरातील ऑईल मिलवर छापा टाकण्यात येत आहे, १८ फेब्रुवारी पासून तपासणी करण्यात येत आहे. हि कारवाई केंद्रीय प्राप्तीकर विभागाचे उपसंचालक आणि त्यांच्या पथक करित आहे.