अपघातात जखमी झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू

    सोलापूर : सोलापूर-पुणे मार्गावरील बाळे पुलाजवळ असलेल्या नेक्सा शोरूमजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील अनिल हरिदास पवार (वय ४२, रा. बीबीदारफळ ता. उत्तर सोलापूर) हे जिपचे कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. मात्र, त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला.

    अनिल पवार हे जिल्हा परिषद येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सहाय्यक म्हणून काम पाहत होते. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले होते. बाळे पुलाच्या अलीकडे अनोळखी वाहनाच्या धडकेने से गंभीर होऊन जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

    एमआयडीसी, पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल गुलचंद पवार यांचे ते चुलत बंधू होते. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. हवालदार कसबे पुढील तपास करीत आहेत.