सुभाष पाटील, वडापूर
सुभाष पाटील, वडापूर

वडापूर ग्रामपंचायतीत दलित वस्ती, चौदावा वित्त आयोग, मुद्रांक शुल्क व गौण खनिज आदी योजनांच्या माध्यमातून कोटीच्या घरात विकास निधीची रक्कम जमा झाली होती. मात्र या ग्रामपंचायतीला गौण खनिजची साडेतीन कोटी इतकी मोठी रक्कम प्राप्त झाली.

  भंडारकवठे  : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

  वडापूर ग्रामपंचायतीत दलित वस्ती, चौदावा वित्त आयोग, मुद्रांक शुल्क व गौण खनिज आदी योजनांच्या माध्यमातून कोटीच्या घरात विकास निधीची रक्कम जमा झाली होती. मात्र या ग्रामपंचायतीला गौण खनिजची साडेतीन कोटी इतकी मोठी रक्कम प्राप्त झाली. गौण खनिजच्या मोठ्या रक्कमेच्या खर्चाच नियोजनच करण्यात आलेला नाही. साडेतीन कोटी रुपये मधून रस्ते, गटार व अन्य कामे एकदाच निविदा काढून न करता. त्या रक्कमेच्या व्याजातून केलेले विविध कामे निकृष्ठ करण्यात आलेली आहेत.

  शिवाय प्रशासकाच्या काळातही अफरातफर झाल्याची तक्रार राष्ट्रवादीचे पाटील यांनी यात नमूद केलेली आहे. चौकशी करण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आला आहे. याची सखोल व खातेनिहाय चौकशीची मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री. पाटील यांनी केली आहे.

  कोणत्याही निधीची अफरातफर झालीच नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासकाच्या आदेशाने कामे करण्यात आलेली आहेत. प्रत्येक काम शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात येतात. ग्रामविकास अधिकारी हे त्यांची अंमलबजावणी करतात.

  काशिनाथ घोंगडे, ग्रामविकास अधिकारी वडापूर

  “वडापूरच्या ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी व्हावी. आणि प्रशासकाच्या काळातही भ्रष्टाचार झाला असून प्रत्येक कामाची चौकशी व्हावी.”

  -सुभाष पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण सोलापूर