वाझे प्रकरणी माझी चौकशी करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान

    पंढरपूर : सचिन वाझे यांच्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारेप होतं आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव लिहून सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याचं राजकारण तापत चाललं आहे. याचं पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खुले आव्हान दिलं आहे.

    दरम्यांन अजित पवार आज पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपुरात आज आले आहेत. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आढीव येथील काळेंच्या फार्महाऊसवर स्नेहभोजनानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाझे प्रकरणी खुलासा हा केला आहे.

    यावेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझे वाझेशी कधी संभाषण देखील झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचं काहीच कारण नाही. तरीही माझे नाव का घेतले हे मला माहिती नाही माझे याप्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल. विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.

    लसीच्या तुटवड्याबाबत उपमुख्यमंत्री काय म्हणाले ?

    महाराष्ट्राला जेवढी लस मिळायला पाहिजे तेवढी लस मिळत नाही. सुरवातीच्या काळात केंद्राने परदेशात लस पाठवण्याची घाई केली पण ठीक आहे. ती पण आपलीचं भावंड आहेत. आपल्या देशात तयार होणारी लसं आपल्या लोकांना आधी मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे. बाहेरच्या देशात लस पाठवण्या ऐवजी, आता देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच ३५० कोटी लसीचं वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राला 7 लाख 50 हजार लसी मिळाल्या आहेत. ठराविक दिवसात लसीकरण संपावायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लावल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट के