जिल्हा परिषद सोलापूरतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन साजरा

    सोलापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना Be With Yoga – Be At Home ही आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरांमध्ये कुटुंबासोबत राहून त्रिसूत्रीचे पालन करून योगाभ्यास करणेबाबत सूचित केले आहे.

    यावेळी विविध विभागातील अंदाजे १०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी ७ ते ८ या वेळेमध्ये योग प्रात्यक्षिकांमध्ये ऑनलाइन सहभाग नोंदविला. जागतिक कोरोना महामारीचे महत्त्व लक्षात घेता योग व त्यामधील आसन व प्राणायामाचे महत्व याबाबत पतंजली योगपीठ प्रशिक्षित योगतज्ञ अनिल वेदपाठक व अक्षय वेदपाठक यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले.

    मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना योगबाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम जिल्हा आयुष कक्ष सोलापूर आणि माहिती तंत्रज्ञान कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सहकार्याने संपन्न झाला. तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आयुर्वेदिक दवाखाना आणि उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे योग प्रात्यक्षिके घेण्यात आले.