पूजनीय कमलाबाई दंडवते यांचे देहावसान

    सोलापूर : श्री क्षेत्र गाणगापूर येथील दंडवते संस्थानच्या मातोश्री श्रद्धेय पूज्य कमलाबाई प्रभुराज दंडवते तथा आईसाहेब यांना सोलापूर स्वस्थानात शनिवारी (दि. २१) दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी देवाज्ञा झाली. त्या सद्गुरू चरणी लीन झाल्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यामागे गाणगापूर पीठाधीश योगीराज महाराज, हैद्राबाद मठाचे श्री आनंदमूर्ती आणि सोलापूर स्थानाचे श्री गोविंदराज महाराज हे तीन सुपुत्र, चार कन्या, जावई, नातवंडं, आप्त आणि मोठा भक्त परिवार आहे.

    श्री क्षेत्र गाणगापूर येथे रविवारी सकाळी अकरा वाजता अंत्यविधी होईल. रविवारी सकाळी 9 ते 11 पर्यंत श्री क्षेत्र गाणगापूर स्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. आईसाहेबांनी पूज्य गुरुनाथ बाबांची दीर्घकाळ श्रद्धापूर्वक सेवा केली. गाणगापूर, हैद्राबाद आणि सोलापूर या तिन्ही मठातील सर्व उत्सव, अनुष्ठान, उपासना यामध्ये त्यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभत असे.