सोलापूर नगरपालिकेच्या आरोग्य सुविधांमध्ये कमतरता – शरद पवार

  • सोलापूरात कोरोनाविषयक उपाययोजना उत्तम आहेत. त्यामध्ये आरोग्य मंत्रीही लक्ष घालून काम करत आहे. आरोग्यमंत्र्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदत करणे गरजेचे आहे. सोलापूरतील रुग्णालयांमध्ये साधनांची कमतरता आहे. तसेच त्याची उपलब्धता करुन दिली पाहिजे. रुग्णालयात अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यासाठी ते भरती केले पाहिजेत. महापौर म्हणाले नगपालिकेच्या आरोग्य सुविधांमध्ये कमतरता आहे. त्यावर सरकारकडून अनुदान मिळवून देऊन मदत केली पाहिजे असे शरद पवार म्हणाले.

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत रविवारी (दि १९ जुलै) ला सोलापूर दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी कोरोना नियंत्रणाची आणि कोरोनावरील उपाययोजनांची पाहणी केली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. सोलापूरात बोलताना शरद म्हणाले सोलापूराशी ऋणानुबंध असल्यामुळे हा दौरा करत आहे. तर राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

काय म्हणाले शरद पवार 

शरद पवार म्हणाले की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आरोग्यमंत्र्याना अधिक सहकार्य केले पाहिजे. सोालापूर हे संकटांना शह देणारे शहर आहे. स्वातंत्रपूर्वी प्लेगची साथ आली होती तेव्हा त्या प्लेग महामारीवर मात करणाऱ्या शहरांमध्ये सोलापूरचा समावेश होता. तसेच सोलापूरच आणखी एक वैशिष्ट्य आहे की जे खूप लोकांना माहित नाही आरोग्य मंत्री आणि पालक मंत्री यांना माहित नसेल. स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी अगदी थोड्या काळात ब्रटिशांची सत्ता घालवण्यात यशस्वी झाले होते. सोलापूर हे हुतात्म्यांचे शहर आहे. ब्रिटिशांना हरवणाऱ्या सोलापूरला कोरोनाला हरवणे फार कठीण नाही. सोलापूरने ठरवले आणि एक मार्ग दाखलला तर तो संपूर्ण राज्यासाठी उपयुक्त ठरेल. 

सोलापूरात कोरोनाविषयक उपाययोजना उत्तम आहेत. त्यामध्ये आरोग्य मंत्रीही लक्ष घालून काम करत आहे. आरोग्यमंत्र्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदत करणे गरजेचे आहे. सोलापूरतील रुग्णालयांमध्ये साधनांची कमतरता आहे. तसेच त्याची उपलब्धता करुन दिली पाहिजे. रुग्णालयात अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यासाठी ते भरती केले पाहिजेत. महापौर म्हणाले नगपालिकेच्या आरोग्य सुविधांमध्ये कमतरता आहे. त्यावर सरकारकडून अनुदान मिळवून देऊन मदत केली पाहिजे असे शरद पवार म्हणाले. 

आम्ही सर्व गोष्टींची नोंद केली आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन त्या मुख्यमंत्र्यांपुढे सादर करू. यातून सोलापूरातील कोरोनावरीर उपाययोजना आणि यंत्रणांना मदत करुन हातभर लावू असे शरद पवार सोलापूर दौऱ्यात म्हणाले.