पंढरपूरातील इतर कारखान्यांच्या सभासदांचा ऊस पांडुरंग व युटोपियनच्या माध्यमातून गाळप करू : प्रशांत परिचारक

    अकलुज : पंढरपूर तालुक्यातील इतर कारखान्यांच्या सभासदांचा संपूर्ण ऊस पांडुरंग व युटोपियन त्यांच्या माध्यमातून गाळप करू. तालुक्यातील त्या ऊस उत्पादकाला वार्‍यावर सोडणार नाही, असे पांडुरंग कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी सांगितले.

    ३० वी पांडुरंग कारखान्याची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण पार पडली. त्या सभेत बोलत होते. ते बोलत होते. कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, व्हा. चेअरमन वसंतराव देशमुख, दिलीप चव्हाण, बाळासो सालविठ्ठल, दाजी पाटील कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदी संचालक व सभासद उपस्थित होते.

    श्रीपुर ता.माळशिरस  येथे पांडुरंग कारखानास्थळावर ३० वी ऑनलाइन अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यामध्ये कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी वाचलेल्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

    चेअरमन आमदार प्रशांत परिचारक पुढे बोलताना म्हणाले की, केंद्राने गेले दोन वर्षांपूर्वी साखरेचे दर निश्चित केल्यामुळे कारखानदारी टिकून राहिली आहे. तसेच निर्यात धोरण व इथेनॉल निर्मिती व प्राधान्य देण्याचे काम केले आहे. शेतकऱ्याने घाम गाळून पिकलेला ऊस, विश्वासाने कारखान्याला गाळपास देतात पण ऊस बिल मिळत नसल्यामुळे शेतकरी त्यांच्या हक्काच्या पैशासाठी रस्त्यावर यावे लागते. त्यासाठी  राज्य शासनाने सत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणता कारखाना चांगला की वाईट हे निकष जाहीर केले आहेत. त्यामध्ये हिरवा, नारंगी, तांबडा असे अशा रंगांमध्ये कारखान्याची वर्गवारी केली आहे. जो कारखाना हिरव्या रंगांमध्ये आहे, तो कारखाना आर्थिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट आहे.

    तसेच जे कारखाने तांबड्या म्हणजे रेड झोनमध्ये आहेत. त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, असे दाखवण्यात आले आहे. पांडुरंग कारखाना सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम स्थानावर हिरव्या रंगांमध्ये आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, वेळेत व सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना म्हणून नावारूपाला आला आहे. पंढरपूर तालुक्यातील बंद पडलेल्या कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण ऊस पांडुरंग व युटोपियन कारखान्याच्या माध्यमातून आम्ही गाळप करणार आहोत.