चिंचोली येथे विज पडून १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार

-प्रशासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी : शिवाजी गडदे पशुपालक शेतकरी

    सांगोला : विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आणी झालेल्या पावसात चिंचोली -वाघमोडेवाडी येथील पशुपालक शेतकरी शिवाजी विष्णू गडदे यांच्या शेळ्या-मेंढ्यांच्या वाडग्यावर विज पडून लहान मोठ्या अशा एकूण १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्याची घटना काल शनिवार दि. २९ मे रोजी रात्री ९ वा. सुमरास घडली आहे. पंचनाम्यातील अंदाजे रकमेनुसार ३ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीच कोरोनाने हैराण झालेल्या पशुपालक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने पशुपालक शेतकरी मोठा हतबल झाले आहे. यावर प्रशासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, वाघमोडेवाडी चिंचोली येथील पशुपालक शेतकरी शिवाजी गडदे हे नेहमीप्रमाणे शनिवारी शेळ्यामेंढ्याना चारून सायं. घरा शेजारील वाडग्यात पडल्या होत्या दरम्यान रात्री नऊच्या सुमारास मेघगर्जना सह वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान सदर पावसात पशुपालक शेतकरी शिवाजी गडदे यांच्या शेळ्यामेंढ्या च्या वाडग्यावर वीज पडल्याने ११ लहान मोठ्या मेंढ्या, २ शेळ्या व पाठ आशा एकुण १४ शेळ्या-मेंढ्या जागीच मरण पावल्या आहेत.

    चिंचोली येथील वीज पडून शेळ्या-मेंढ्या ठार झाल्याची माहिती पोलीस पाटील हरिदास बेहरे पाटील यांनी तहसीलदार अभिजीत पाटील यांना दिली असता, तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगोला तलाठी विकास माळी यांना तात्काळ घटनास्थळी पोचण्याचे आदेश दिले. त्यानुसार सांगोला तलाठी विकास माळी यांनी चिंचोली येथे घटनास्थळी धाव घेतली. मृत शेळ्या-मेंढ्यांचा पंचनामा केला. दरम्यान पंचनाम्यातील अंदाजे रकमेनुसार ३ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुर्वे यांनी मृत शेळ्या-मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. यावेळी यापूर्वीच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हतबल झाली आहे. यामध्ये निसर्गाने फटका दिल्याने पशुपालक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यावर प्रशासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे.यावेळी पोलीस पाटील हरिदास बेहरे, ग्रामपंचायत सदस्य तथा युवा नेते शंकर खरात, तहसिलचे विनय अटक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.चिंचोली येथे विज पडून १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्याची माहिती पोलीस पाटील हरिदास बेहरे पाटील यांनी तहसीलदार अभिजीत पाटील यांना दिली असता, तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगोला तलाठी विकास माळी यांना तात्काळ घटनास्थळी पोचण्याचे आदेश दिले. त्यानुसार सांगोला तलाठी विकास माळी यांनी चिंचोली येथे घटनास्थळी धाव घेतली. मृत शेळ्या-मेंढ्यांचा पंचनामा केला. दरम्यान पंचनाम्यातील अंदाजे रकमेनुसार ३ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुर्वे यांनी मृत शेळ्या-मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. यावेळी यापूर्वीच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हतबल झाली आहे. यामध्ये निसर्गाने फटका दिल्याने पशुपालक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यावर प्रशासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे.यावेळी पोलीस पाटील हरिदास बेहरे, ग्रामपंचायत सदस्य तथा युवा नेते शंकर खरात, तहसिलचे विनय अटक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.