पुढील एक-दोन दिवसांत लॉकडाऊन होण्याची शक्यता, १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागणार?

राज्यातील ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर, रायगड, सोलापूर, नाशिक, जालना, नगर, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद, लातूर, नांदेड, बुलडाणा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्णवाढ आहे. सार्वजनिक वाहतूक सुरु असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

    सोलापूर : १ ते १० एप्रिल या काळात राज्यात तब्बल चार लाख ८८ हजार रुग्ण वाढले असून पावणेतीन हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर १७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन होऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी, नागरिकांना जिवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी व परराज्यातील व राज्यातील विविध जिल्ह्यांमधील जे कामगार इतरत्र आहेत, त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वेळ जाणार आहे.

    राज्यातील ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर, रायगड, सोलापूर, नाशिक, जालना, नगर, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद, लातूर, नांदेड, बुलडाणा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्णवाढ आहे. सार्वजनिक वाहतूक सुरु असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. आता बहुतेक जिल्ह्यांमध्ये शनिवार, रविवार वगळता सोमवार ते शुक्रवार, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडीत होणे अशक्‍य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

    दरम्यान, लॉकडाउन हा अचानक केला जाणार नसून त्याची नागरिकांना काही दिवस अगोदर पूर्व कल्पना दिली जाणार आहे. त्यामुळे कोणीही बसस्थानक, रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.