पंढरपूर बस स्थानकातून सुरू होणार लांब पल्ल्याच्या गाड्या

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणाहून अनेक महत्त्वाच्या शहरात जाणाऱ्या एसटी बसेस कोरोना च्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट आल्याने सोलापूर जिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरू करण्यात आले आहे यामध्ये पंढरपूर बस स्थानकातून पुणे, मुंबई, औरंगाबाद ,शिर्डी, अहमदनगर, लातूर, बीड, मेहकर, नाशिक, निजामबाद, गुहागर, अक्कलकोट सह सोलापूर जिल्ह्यातील विविध शहरात या बसेस आजपासून मार्गक्रमण होणार आहेत.

    पंढरपूर : कोरोना महामारी च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सुरू केलेला लॉकडाऊन यामध्ये पंढरपूर आगारातून सर्व एसटी बसेस सोलापूर जिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान राज्य सरकारने अनलॉक सुरू केले असल्याने आजपासून पंढरपूर आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात येत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड यांनी दिली.

    पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणाहून अनेक महत्त्वाच्या शहरात जाणाऱ्या एसटी बसेस कोरोना च्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट आल्याने सोलापूर जिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरू करण्यात आले आहे यामध्ये पंढरपूर बस स्थानकातून पुणे, मुंबई, औरंगाबाद ,शिर्डी, अहमदनगर, लातूर, बीड, मेहकर, नाशिक, निजामबाद, गुहागर, अक्कलकोट सह सोलापूर जिल्ह्यातील विविध शहरात या बसेस आजपासून मार्गक्रमण होणार आहेत प्रवाशांनी एसटी बस मधून प्रवास करताना शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत स्वतःजवळ सॅनिटायझर व मास्क बांधणे बंधनकारक आहे मास्क नसेल तर एसटी बस मध्ये प्रवेश नाकारण्यात येणार असल्याने प्रत्येक प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे यावेळी आगार व्यवस्थापक यांनी सांगितले