महा ई सेवा केंद्राने दिला बोगस अन्न परवाना ; पंढरपूरमध्ये किराणा दुकानदार व केंद्रचालकांवर गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई करीत आहे. या कारवाईमुळे अनेक गुटखा विक्री करणारे आणि विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांची झोप उडाली आहे. जिल्ह्यात अनेक अन्न व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. त्यांनी आपले अन्न परवाने त्वरीत काढून घेऊन संभाव्य होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन ( अन्न ) सहआयुक्त प्रदिपकुमार राऊत यांनी केले आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यवसायिकांना ६ महिने व रूपये ५ लाखापर्यत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

    पंढरपूर : अन्न व औषध प्रशासनाच्या तापसणीत करकंब (ता. पंढरपूर)येथील किराणा दुकानाचे अन्न नाेंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दुकानदार व महा ई सेवा केंद्र चालगकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी करकंब (ता. पंढरपूर)येथे अन्न आस्थापनाची नियमित तपासणी करीत असताना आदिक किराणा स्टोअर्स, जळोली चौक, करकंब या पेढीच्या अन्न नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.

    सोलापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई करीत आहे. या कारवाईमुळे अनेक गुटखा विक्री करणारे आणि विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांची झोप उडाली आहे. जिल्ह्यात अनेक अन्न व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. त्यांनी आपले अन्न परवाने त्वरीत काढून घेऊन संभाव्य होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन ( अन्न ) सहआयुक्त प्रदिपकुमार राऊत यांनी केले आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यवसायिकांना ६ महिने व रूपये ५ लाखापर्यत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे प्रमाणपत्रे तपासणी वेळी अन्न सुरक्षा अधिकारी यांना शंका वाटली. त्यावरून कुचेकर यांनी केंद्र शासनाच्या फॉस्कॉस या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी प्रमाणपत्राची सत्यता तपासली असता नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे व नोंदणी प्रमाणपत्रात अनधिकृतपणे फेरफार केल्याचे लक्षात आले. पेढी मालकाकडे अधिक चौकशी केली असता प्रमाणपत्र करकंब येथील महा ई सेवा केंद्र चालक समाधान गुंड यांच्या कडून प्राप्त झाले असल्याचे त्याने सांगितले.