जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सेवापुस्तक अॉनलाईन प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) परमेश्वर राऊत
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सेवापुस्तक अॉनलाईन प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) परमेश्वर राऊत

जिल्हा परिषदअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी व प्रशासकीयदृष्ट्या जिल्ह्याचा राज्यात नावलौकिक वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अॉनलाईन करण्याचे काम येत्या मार्च अखेर पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

    सोलापूर : जिल्हा परिषदअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी व प्रशासकीयदृष्ट्या जिल्ह्याचा राज्यात नावलौकिक वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अॉनलाईन करण्याचे काम येत्या मार्च अखेर पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

    जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सेवापुस्तक अॉनलाईन प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.पुढे ते म्हणाले , जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कोणत्याही कामाचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे.विशेषतः जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना भविष्यातील येणारी अडचण टाळण्यासाठी त्यांची सेवा पुस्तके अद्ययावत करुन , त्याचे चांगल्या पद्धतीने स्कॅनींग करुन ऑनलाईन करणे आवश्यक आहे.म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील आस्थापनाचे लिपीक , अधिक्षक , कक्ष अधिकारी यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि सेवा पुस्तके अॉनलाईन करण्याची मोहिम येत्या मार्च अखेर पूर्ण करणे अपेक्षित असल्याचेही सांगितले.

    यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) परमेश्वर राऊत यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतील सेवा पुस्तक अॉनलाईन करण्याचा उपक्रम लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन करुन सेवा पुस्तक अद्ययावत करणे , अॉनलाईन करणे याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यशाळेमध्ये बार्शी पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक आनंद साठे व श्री.स्वामी यांनी माझे सेवापुस्तक माझ्या मोबाईलमध्ये या विषयावर सेवा पुस्तक कमीत कमी वेळेत कशा पद्धतीने ऑनलाईन करावयाची आहेत याबद्दल पीपीटीच्या माध्यमातून सविस्तरपणे मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेस जिल्हा परिषद मुख्यालय , प्राथमिक आरोग्य केंद्र ,पंचायत समिती व तालुका अंतर्गत आस्थापना लिपिक , अधिक्षक , कक्ष अधिकारी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.