प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुका काँग्रेसकडून निषेध

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने केलेल्या शेतकरी हत्याकांडानंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली.

    अकलूज : उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने केलेल्या शेतकरी हत्याकांडानंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली. त्याबाबत तसेच शेतकरी हत्याकांडाचा हुकूमशाही सरकार उत्तरप्रदेश सरकारचा माळशिरस तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

    या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले असून, अशाप्रकारे हुकूमशाही व दंडेलशाहीने वागणाऱ्या मोदी, योगी सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत. तरी आमच्या भावना भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती केली. त्यावेळी अकलूज ग्रामपंचायतच्या माजी सदस्या ज्योती कुंभार, रघुनाथ साठे, सुरेश साठे, अनिल खत्रे, विनोद सांळुखे, दादा नाईकननवरे आदी उपस्थित होते.