मानेगाव गणातून रासपकडून लढणार :  वैभवी भिसे

मानेगाव गट व गणातील जनता विकासापासून वंचित राहिली आहे. यापुढे या भागाचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका  माढा तालुक्यात मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी केल्याचे भिसे यांनी सांगितले. 

    कुर्डूवाडी  : आगामी पंचायत समितीची निवडणूक मानेगाव गणातून लढविणार असल्याचा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाच्या माढा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा वैभवी भिसे यांनी व्यक्त केला. मानेगाव गट व गणातील जनता विकासापासून वंचित राहिली आहे. यापुढे या भागाचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका  माढा तालुक्यात मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी केल्याचे भिसे यांनी सांगितले.

    मानेगाव गणामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला तसेच माजी मंत्री महादेव जानकर यांच्या विचाराला मानणारा मोठा वर्ग आहे. मानेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य आहेत परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारचा विकास  झालेला दिसत नाही. त्यामुळे गोरगरीब, कष्टकरी ,शेतकरी यांच्यात तीव्र नाराजी आहे. लवकरच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर यांच्यासोबत तसेच तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकऱ्यांसोबत चर्चा करून  या मतदारसंघाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मानेगाव सह, केवड, उंदर गाव,अंजनगाव या गावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा फार मोठा वर्ग आहे त्यामुळे या मतदारसंघातून स्वतः आपण  उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे भिसे यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रियंका वाघमोडे,गोरख  वाकडे, दिलिप दादा गडदे , गणेश खांडेकर, नागेश लवटे, रुपेश खांडेकर,  यांच्यासह रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.