maratha aandolan

सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणाविरोधात आज बंद पुकारला आहे. तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलने करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात माढा येथे रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.

सोलापूर : मराठा आरक्षण स्थगिती आज पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग रोखला आहे. वेळापूरच्या पुढे असणाऱ्या निमगाव पाटीजवळ मराठा तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला. एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत दोन्ही बाजूंची वाहतूक रोखली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास सध्या स्थगित दिल्याच्या निषेधार्थ २१ सप्टेंबर २०२० रोजी माराठा समाज व मराठा आरक्षणाशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद काळात एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू शकतात. म्हणून २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ०१ मिनिटांपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांन घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांच्या घरांसमोर निदर्शने

सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणाविरोधात आज बंद पुकारला आहे. तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलने करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात माढा येथे रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. तर शहरात सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आंदोलनासाठी कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.