मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रोश मोर्चा, पंढरपुरात कर्फ्यू ; एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रोश मोर्चा, पंढरपुरात कर्फ्यू ; एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उद्या ७ नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून मुंबई (Pandharpur-Mumbai) येथे पायी दिंडी-आक्रोश मोर्चा (Pai Dindi-Aakrosh Morcha) निघणार आहे. पायी दिंडी ही येथील नामदेव पायरीचे (Namdev Payari) दर्शन करून मुंबईकडे रवाना होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir) परिसरात संचारबंदी (Curfew) तर शहरात जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारीत केले आहेत.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, पंढरपूर.

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा (Maratha Kranti Tok Morcha) आणि सकल मराठा मोर्चाच्या (Sakal Maratha Morcha) वतीने सरकारविरोधात पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी निघणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाद्वार नामदेव पायरी चौफळा या संपूर्ण परिसरात शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी संचारबंदी लागू केली आहे तर उर्वरित पंढरपूर शहरात दोनपेक्षा अधिक व्यक्तींना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय मराठा आंदोलकांना शुक्रवारपासूनच जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

एसटी सेवाही बंद राहणार Msrtc Servises Closed

पंढरपूरकडे येणारी एसटी बस सेवा देखील दोन दिवसासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय मराठा समाजाच्या या पायी दिंडीसाठी इतर जिल्ह्यातून मराठा समाज येऊ शकतो. या अनुषंगाने पंढरपूरकडे येणारी व जाणारी संपूर्ण एसटी बस वाहतूक शुक्रवार व शनिवारी बंद ठेवण्याचे देखील आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहेत. संबंधित आदेशामध्ये जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता, अशा मोर्चाने संसर्गाचे प्रमाण अधिक वाढू शकते असेही नमूद करण्यात आले आहे.

सकारला इशारा warning to the govenment

मराठा समाजाचा राजकारणासाठी उपयोग करू नये, असा इशारा सकल मराठा समाजाने सरकार व विरोधीपक्षाला दिला आहे. विठ्ठलाला साकडे घालून ७ नोव्हेंबरला धडक आक्रोश मोर्चा निघणार आहे, अशी माहिती मराठा सकल मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर व महेश डोंगरे यांनी दिली आहे.