उपसभापती श्रीशैल नरोळे
उपसभापती श्रीशैल नरोळे

सोलापूर बाजार समितीमध्ये लांबून शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतात. त्यांना निवासाची सोय व्हावी यासाठी शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पणन संचालकांनी मान्यता दिली आहे. बाजार समितीने २०१८ साली शेतकरी भवन साठी प्रसाद दिला होता. तो मंजूर झाला आहे.

    सोलापूर : सध्या ग्रामीण भागात कोरुना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांना लागणारे साहित्य साठी दोन कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय मासिक बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी दिली.

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठक गुरुवारी उपसभापती नरोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दोन दिवसापूर्वी ही मासिक बैठक तहकूब करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली.

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिवदारे मंगल कार्यालय येथे कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली मागील काही दिवसांपूर्वी सुरू होत्या. परंतु महापालिका व समितीच्या संचालकांमध्ये समन्वयामुळे हे सेंटर सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील कोरुना बाधित रुग्णासाठी जे साहित्य लागेल ते बाजार समिती देणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबर शहरातील सिविल हॉस्पिटल साठी बाजार समिती ऑक्सिजन बायोपोप देणार आहे. बाजार समिती आवारात तिथे मोबाईल टॉयलेट सुरू करण्यात येणार असल्याचे या प्रसंगी सांगितले.

    सोलापूर बाजार समितीमध्ये लांबून शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतात. त्यांना निवासाची सोय व्हावी यासाठी शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पणन संचालकांनी मान्यता दिली आहे. बाजार समितीने २०१८ साली शेतकरी भवन साठी प्रसाद दिला होता. तो मंजूर झाला आहे. त्याबरोबर ना नफा ना तोटा या तत्त्वावर शेतकऱ्यासाठी बी-बियाणे देण्यात यावे अशी मागणी संचालक प्रकाश चोरेकर यांनी केले. तसेच बाजार समितीमध्ये हमाल तोलार यांच्यासाठी विमा उतरविण्याची मागणी संचालक शिवानंद पुजारी यांनी केले. या बैठकी प्रसंगी संचालक केदार उंबर्जे, बसवेश्वर ईटकळे, बाळासाहेब शेळके, अमर पाटील, प्रकाश वानकर, वसंत पाटील, नामदेव गवळी, राजकुमार वाघमारे, सचिव अंबादास बिराजदार आदी उपस्थित होते.