आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

    सोलापूर : आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे, मद्य विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे यांनी जारी केले आहेत.

    आदेशात म्हटल्यानुसार, पंढरपूर शहरामध्ये 19 ते 24 जुलै 2021 या कालावधीमध्ये आषाढी वारी होत असून, वारीमध्ये अनेक भाविक येत असतात. शहरातील कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी 19 ते 24 जुलै 2021 या कालावधीत मांस, मटण, मासे, मद्य विक्री आणि प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे.

    फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे आदेश लागू करण्यात आल्याची माहिती भारत वाघमारे यांनी दिली.