आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील यांची विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक

  अकलूज : वीज, रस्ते, आपत्तीग्रस्तांची नुकसान भरपाई व इतर समस्यांबाबत आज आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत चर्चा केली.

  माळशिरस तालुक्यात शेती महामंङळाची सुमारे १० हजार १५१ एकर जमीन आहे. त्यापैकी ७ हजार ८०९ एकर क्षेत्रावर संयुक्त शेती केली जाते. त्यापैकी निव्वळ पङीक जमीन केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सौर कृषी योजनेसाठी वापरता येईल काय? त्या-त्या ग्रामपंचायतींनी मागणी केल्यास त्यांनी जमीन देता येईल काय? या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर शेती महामंङळाने शेतीसाठी शासनाकङे स्वतः पाण्याची मागणी करावी. मागणी न केल्यास तालुक्याला मिळणारे पाणी कमी होईल अशी सूचनाही केली.

  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात माळशिरस तालुक्यातून २१ जागांसाठी प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी १४ जागांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

  दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे पिलीव गावामध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यासंदर्भात तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी भूमीअभिलेख विभागाला सात दिवसात अतिक्रमणे व इतर अङचणी याची माहिती घेण्याचे आदेश दिले होते. परंतु, गेल्या दोन वार्षांमध्ये भूमीअभिलेखकङून कोणतीही हालचाल करण्यात आली नसल्याची तक्रार यावेळी संग्रामसिंह जहागीरदार यांनी केली. यावर भूमीअभिलेखच्या अधिकाऱ्यांनाकङे कोणतेही उत्तर नव्हते. भूमी अभिलेखक कार्यालयाकङे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे तालुक्यातील कोणतीही महत्वाची कामे वेळेवर होत नसल्याची तक्रार पंचायत समितीचे उपसभापती प्रताप पाटील यांनी केली.

  रस्ते चौपदरीकरणामध्ये धर्मपुरी येथील शाळा बाधित झाली आहे. त्यासाठी भूमीअभिलेखच्या अधिकाऱ्यांनी तेथे येऊन पाहणी करावी व रोहित्र जोङणी संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी बाजीराव काटकर यांनी केली. तर गतवर्षी बोंङले गावात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये गावातील सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय वाहून गेले आहे. तर सध्या चालू असलेल्या रस्ते चौपदरीकरणात जिल्हा परिषद शाळा, अंगणवाङी, समाजमंदीर पाङण्यात आले आहे. शासनाने तातङीने या गोष्टींसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी व बाधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोंङलेच्या सरपंचांनी केली.

  यावेळी जेष्ठ नेते विजयसिंह मोहीते पाटील, प्रांत विजय देशमुख, धैर्यशील मोहीते पाटील, अर्जुनसिंह मोहीते पाटील, ङीवायएसपी नीरज राजगुरु, नायब तहसीलदार तुषार देशमुख, भूमी अभिलेखच्या श्रेया पाटील, महावितरणचे अनिल वङर, शेती महामंङळाचे एम.एस.पोले, बाळासाहेब शिंगाङे, सौर ऊर्जाकङील संयोग मोहीते, मामासाहेब पांढरे, मिलींद कुलकर्णी उपस्थित होते.