सदस्यत्व रद्द याचिका प्रकरण : मोहिते-पाटील गटाकडून राष्ट्रवादीची कोंडी , मागविली पक्षाची घटना ; जिल्हाधिकारी सुनावणीत युक्तीवाद

सुनावणीनंतर १४ जुलै रोजी पुढील तारीख देण्यात आली आहे. दरम्यान अर्जदार साठे यांचे वकील अॅड. मराठे यांनी माहिती दिली, मोहिते पाटील गटाने दोन अर्ज दिले आहे. तक्रारदार यांच्यावतीने १ अर्ज दाखल करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी एका अर्जात राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेची मागणी केली. पहिल्या अर्जात हायकोर्टाच्या आदेशानुसार प्राथमिक मुद्दा काढावा, याचिका दाखल करताना जी कागदपत्रे सादर केली नाहीत.

    सोलापूर : बहूचर्चीत मोहीते पाटील गटाची सुनवणी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या समोर मंगळवारी घेण्यात आली. सुनवणी दरम्यान मोहीतेपाटील गटानी राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत पक्षाची घटनेची मागणी लावून धरली. त्यामूळे १४ जूलै रोजी पूढील सुनवणी घेण्यात येणार आहे.

    व्हीप झुगारून विराेधात मतदान
    सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीप बजावून ही माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितलदेवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या सहा सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. या सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे.

    शितलादेवी मोहिते-पाटील गैरहजर
    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर दुपारी साडेबारा वाजता सुनावणी होती. यावेळी तक्रारदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे व त्यांच्या वतीने अॅड. उमेश मराठे, अॅड. इंद्रजीत पाटील, अॅड. बाबासाहेब जाधव हजर होते. सुनावणीसाठी स्वरुपाराणी मोहिते पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील हे पाच सदस्य आपले वकील अॅड. दत्तात्रय घोडके, अॅड. अभिजीत कुलकर्णी, अॅड. नितीन खराडे यांनी हजेरी लावली. शितलादेवी मोहिते-पाटील या मात्र आज गैरहजर राहील्या.

    राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेची मागणी
    तब्बल एक तास भर सुनावणी झाली. सुनावणीनंतर १४ जुलै रोजी पुढील तारीख देण्यात आली आहे. दरम्यान अर्जदार साठे यांचे वकील अॅड. मराठे यांनी माहिती दिली, मोहिते पाटील गटाने दोन अर्ज दिले आहे. तक्रारदार यांच्यावतीने १ अर्ज दाखल करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी एका अर्जात राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेची मागणी केली. पहिल्या अर्जात हायकोर्टाच्या आदेशानुसार प्राथमिक मुद्दा काढावा, याचिका दाखल करताना जी कागदपत्रे सादर केली नाहीत. पुरावे नाहीत, त्यावर पूर्ण चौकशी न करता प्राथमिक मुद्द्यावरच पिटीशन डिसमिस करावा, अशा मागणीचा दुसरा अर्ज मोहिते-पाटील गटाने दिला आहे. अॅड. मराठे यांनी दिलेल्या अर्जात या प्रकरणात तोंडी पुरावा जो आहे. तो अगोदर सहा सदस्यांचा देण्यात यावा. नंतर तक्रारदारांना संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर येत्या १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.