जाती-धर्मात फूट पाडून मत विभागणी करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा : प्रणिती शिंदे

    सोलापूर : देश स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोस्तव साजरा करत असताना आज जाती-धर्मात फूट पाडून मते घेऊन सत्तेवर येत आहेत. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. देश स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला, बलिदान दिले. जातीच्या नावाने मते मागणारे काम करु शकत नाहीत, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

    प्रभाग क्रमांक 8 शुक्रवार पेठ बुजुर्गवली हॉल येथे प्रणिती शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत “काँग्रेस मनामनात काँग्रेस घराघरात” या अभियानाचे आयोजन युवा नेते सोहेल कुरेशी यांनी केले होते. यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक हाजी तौफ़ीक़ हत्तुरे, शकील मौलवी, जाबिर अल्लोळी, अंबादास बाबा करगुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देश स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोस्तव साजरा करत असताना आज जाती धर्मात फुट पाडुन मते घेऊन सत्तेवर येत आहेत. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. देश स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्माच्या स्वातंत्र्यसैनिकानी लढा दिला, बलिदान दिले. जातीच्या नावाने मते मागणारे काम करु शकत नाहीत. आपल्या अडचणीच्या वेळी गडप होतात. फक्त जातीच्या नावाने भावना भडकाविण्याचे काम करत, मतविभागणी करत आपली राजकीय पोळी भाजून घेतात. त्याचा थेट फायदा भाजपला होतो.

    काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेस सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला साथ द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्ष निश्चितच करेल, असेही त्या म्हणाल्या.