भाजपचे प्रा. मोहन वनखंडे सपत्नीक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भारतीय जनता पार्टी अनु.जाती मोर्चा प्रदेश संघटन महामंत्री प्रा. मोहन वनखंडे सपत्नीक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता मोहोळ येथे भाजपचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी भारतीय जनता पार्टीचे मोहोळ माजी तालुका अध्यक्ष सतीश काळे, जेष्ठ नेते पद्माकर (आप्पा) देशमुख, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सोशल मीडिया प्रभारी संजीव खिलारे, अ. जा. मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नागेश मेजर क्षीरसागर, रमेश चव्हाण, रामचंद्र (तात्या) साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी मोहोळ तालुका व सोलापूर जिल्हा भाजपा पक्षवाढीच्या अनुषंगाने व अ. जा. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील नियोजित जिल्हा व मंडल दौऱ्याबाबत चर्चा करण्यात आली.

    यावेळी नागेश क्षीरसागर यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटन महामंत्री प्रा. मोहन लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.