सुशीलकुमार शिंदे यांच्या पोस्टरवर शाई टाकल्याचा मोहोळ काँग्रेसकडून निषेध

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : देशाचे माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या पोस्टरवर समाजकंटकांनी शाई टाकली व पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केला या कृत्याचा तीव्र निषेध मोहोळ तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

    यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी तहसीलदार लिंबारे यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे की ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे त्याचा शोध घेऊन तातडीने त्यास अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

    यावेळी काँग्रेसचे किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ काँग्रेस अध्यक्ष ऍड पोपट कुंभार, सुरेश शिवपुजे, राहुल कुर्डे, दाजी कोकाटे, बिरुदेव खरात, ज्ञानदेव कदम, शकील बागवान, सुरेश शिंदे आदींनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे व इतर पदाधिकारी यांच्या बॅनर वर सोलापूर येथे ज्या भ्याड प्रवृत्तीने शाई टाकली त्याच्या निषेधार्थ त्यांची चौकशी करून तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

    यावेळी तालुका कार्याध्यक्ष दाजी कोकाटे, किसान सेल अध्यक्ष नानासाहेब मोरे, मुन्ना हरणमारे, रोहित पारखे, कुंदन जाधव आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.