तब्बल ८३ लाख ७० हजार रुपयांची कर थकबाकी मोहोळ नगरपरिषदेने केले वसूल

मोहोळ नगरपरिषदेने थकबाकीदारांवर वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकी न भरणाऱ्यांची मालमत्ता सील करण्याचा निर्णय घेतला असून थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांच्या नावांचे डिजिटल नगरपरिषदेच्या इमारतीसमोर लावल्याने थकबाकीदारांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.या यादीमध्ये मोठे व्यावसायिक, राजकीय नेतेमंडळी यांचादेखील समावेश आहे. नगरपरिषद प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे थकबाकी भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.

  मोहोळ: मोहोळ नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या शेकडो मालमत्ताधारकांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी थकवल्यामुळे मार्च महिन्यामध्ये मोहोळ नगरपरिषदेच्या कर विभागाने प्रभावी वसुली अभियान राबवून सन २०२०-२०२१  या आर्थिक वर्षात तब्बल ८३ लाख ७० हजार रुपयांची कर थकबाकी भरून घेण्यामध्ये यश मिळवले आहे.

  गत वर्षभरापासून मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, कर निर्धारण आणि प्रशासन अधिकारी सुवर्णा हाके यांच्यासह विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत शहरवासीयांची असलेली मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवली आहे. या मोहीमेला काही शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून कसल्याही प्रकाराचा मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांची स्वतंत्र यादी करून नगरपरिषदेसमोर त्या नावांचा आणि त्यांच्या असलेल्या थकबाकीच्या रकमेचा उल्लेख करून फ्लेक्स लावण्यात आले आहेत. सदरची थकबाकी न भरल्यास नोटीस देऊन जप्तीची कारवाई नगरपरिषद प्रशासन करणार आहे. त्याच बरोबर ज्या ज्या नगरपरिषदेच्या गाळेधारकांनी गाळ्याचे भाडे थकवले आहे सदरचे गाळे ताब्यात घेऊन त्रिसदस्यीय समितीद्वारे सदर गाळ्याचे फेरमूल्यांकन करून पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

  मोहोळ नगरपरिषदेने थकबाकीदारांवर वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकी न भरणाऱ्यांची मालमत्ता सील करण्याचा निर्णय घेतला असून थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांच्या नावांचे डिजिटल नगरपरिषदेच्या इमारतीसमोर लावल्याने थकबाकीदारांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.या यादीमध्ये मोठे व्यावसायिक, राजकीय नेतेमंडळी यांचादेखील समावेश आहे. नगरपरिषद प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे थकबाकी भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.

  हे आहेत मोठे थकबाकीदार
  १.सहाय्यक अभियंता उपकेंद्र मोहोळ:- रु १० लाख ५४ हजार ९९०
  २.खरेदी विक्री संघ मोहोळ:- रु ३६ हजार २६४
  ३.चंद्रमोळी औद्योगिक वसाहत:- रु २ लाख ३६ हजार
  ४.राज्य वखार महामंडळ:-रु ५७ हजार ६५७
  ५.रिलायन्स टॉवर:- ८४ हजार २७०

  विविध संस्था व काही मालमत्ता धारक यांच्याकडे अनेक वर्षांपासून थकबाकी आहे. नगरपरिषदेने वसुली मोहीम तीव्र केली आहे. दरम्यान कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने आमच्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या उपाययोजना संदर्भातील काम वाढले असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे त्यामुळे मालमत्ता धारकांनी स्वतःहून कराची थकबाकी भरून कायदेशीर कारवाई टाळावी व प्रशासनाला सहकार्य करावे.

  - एन. के. पाटील मुख्याधिकारी, मोहोळ नगरपरिषद