मनपा आयुक्त शिवशंकर यांचा दणका : कर बुडव्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले ; एका दिवशी १० लाख वसूल तर ९ दुकाने सील

सोलापूर महानगर पालिका आयुक्त शिवशंकर यांनी कर थकीत व्यापारीना जोरदार दणका दिला आहे. सोमवारी एकाच दिवसात १० लाखांची थकबाकी वसूलीसह ९ दुकाने सील करण्यात आले आहे. त्यामूळे कर थकीत ठेवणाऱ्या व्यापारीचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

    सोलापूर : सोलापूर महानगर पालिका आयुक्त शिवशंकर यांनी कर थकीत व्यापारीना जोरदार दणका दिला आहे. सोमवारी एकाच दिवसात १० लाखांची थकबाकी वसूलीसह ९ दुकाने सील करण्यात आले आहे. त्यामूळे कर थकीत ठेवणाऱ्या व्यापारीचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

    महानगर पालिकेच्या कर विभागाने कर वसूलीची मोहीम हाती घेतली आहे. थकीत कर संकलनाची यादी तयार करण्यात आली आहे. कर चुकविणाऱ्या व्यापा-यांना वारंवार सुचीत करून ही कर भरण्यात येत नसल्यामूळे कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. शहर परिसरातील ९ लाख ७५ हजार थकीत करापोटी ९ दुकाने सील करण्यात आले आहे. कोरोना लॉकडाऊनमूळे कर थकीत राहील्यांचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामूळे दुकाने सील करू नये आशी त्यांची मागणी आहे. मात्र ही मागणी कर संकलन विभागाने फेटाळून लावली आहे.