माझं गाव कोरोनामुक्त गाव ; राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल रहाण्यासाठी सरपंचाचे योगदान महत्वाचे ठरणार : दिलीप स्वामी

-कोरोनामुक्त गावाना लवकर भेटी देणार असल्याचे सांगितले

  सोलापूर : माझं गाव कोरोनामुक्त गाव हा आपला पँटर्न राज्यात शासन आदेशाने लागु झाला तर सरपंचानी जिल्ह्यातील सर्वाधिक गावे कोरोनामुक्त करुन सोलापूर राज्यात अव्वल राहण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.

  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालनात सरपंच परिषद संघटनेची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबवून गावे कोरोनामुक्त करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अँड विकास जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील महिला जिल्हाध्यक्षा सौ.कविता घोडके पाटील, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हा समन्वयक पंडित ढवण,कुलदिप कौलगे,नुतन तालुका पदाधिकारी भाऊसाहेब लामकाने, पंडीत खरे,अँड धनंजय बागल डाँ. अमोल दुरंदे,शिवशंकर ढवण,सुधाकर मिरगणे,विकास माने ,डॉ. रजनी सुरवसे,संभाजी पाटील, अरुणा गवळी,चंद्रप्रभा भास्कर,संतोष कुंभार, जयश्री पाटील,रावसाहेब पाटील भावना बिराजदार, जयश्री सगरे,गणपत यादव आदि उपस्थित होते.

  कोरोना महामारीचे संकट रोखण्यास सरपंच पदाधिकाऱ्यांनी दिलेले योगदान मोठे असुन माझं गाव कोरोना मुक्त गाव या संकल्पनेस प्रतिसाद दिलात शासनाकडून या अभियानाचे कौतुक झाले तर हा सोलापूर जिल्हा परिषदेचा पँटर्न राज्यात अंमलात आणला.शासनाने यास प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा जाहीर केली यामध्येही सोलापूर जिल्हा आघाडीवर रहावा यासाठी सरपंचांनी अधिक जिद्दीने काम करण्याचे आवहान स्वामी यांनी केले.तर गावाचे विकासासाठी सरपंचाचे पाठीशी प्रशासन राहील असे सांगितले.

  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचाही सत्कार महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.आपला आदर्श व प्रेरणा घेऊन महिला सरपंच जोमाने काम करीत असल्याचे यावेळी संघटनेने सांगितले तर विकास कामात कोण विनाकारण अडथळा निर्माण करीत असेल तर निश्चित कारवाई करेन असे सातपुते यांनी सांगितले. यावेळी तालुका निहाय समन्वयक पदाचे नियुक्तीपत्र
  देण्यात आली.

  पंचायत राज व्यवस्थेच्या त्रीस्तरातील ग्रामीण भागात विकासाचे काम करणारी ग्रामपंचायत ही महत्त्वाची संस्थाआहे.केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांची गावात अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच व पदाधिकारी यांचे योगदान मोठे असुन राजकिय अथवा काही कारणावरुन कामात व कामकाजात अडथळा आणण्याचे काही ठिकाणी प्रयत्न केले जातात.विकासाचे कामात हेतुपूर्वक अडथळा आणल्यास सरपंच संघटना सरपंचाचे पाठीशी राहील असे अँड विकास जाधव यांनी सांगितले. तर नुतन तालुका समन्वयकांनी व सरपंचानी गाव कोरोना मुक्त करण्यासाठी व विकास कामात अग्रेसर राहण्याचे आवहान केले. उपस्थित पदाधिका-यांचे स्वागत आदिनाथ देशमुख यांनी केले.तर आभार अँड बागल यांनी मानले. यावेळी ११ तालुक्यात महिला व पुरुष समन्वयक पदाचे निवडी जाहीर करण्यात आल्या.