bogus voting card

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विविध प्रभागांमध्ये तब्बल ५२८ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. त्या समाविष्ट केलेल्या नावाबाबत माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश क्षीरसागर, अशोक गायकवाड, सोमेश क्षीरसागर आदींसह १६ जणांनी आक्षेप घेत मोहोळ विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकार तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली होती.

    मोहोळ:मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील मतदार यादीमध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याबाबत मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ५२८ व्यक्तींच्या नावावर हरकती घेतल्यामुळे तहसील विभागाने संबंधित सर्व व्यक्तींना नोटिसा देऊन हरकतींची सुनावणी ठेवली होती. त्यादरम्यान केवळ १३३ मतदारांनी सबळ पुरावे सादर केले. तर ३९५ मतदारांच्या बाबतीत कोणतेही पुरावे मुदतीत सादर न झाल्याने मोहोळ विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी त्यांची नावे मोहोळच्या यादी भागातून वगळली. याबाबतचा आदेश नुकताच पारित करण्यात आला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विविध प्रभागांमध्ये तब्बल ५२८ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. त्या समाविष्ट केलेल्या नावाबाबत माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश क्षीरसागर, अशोक गायकवाड, सोमेश क्षीरसागर आदींसह १६ जणांनी आक्षेप घेत मोहोळ विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकार तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक शाखेने संबंधित ५२८ मतदारांना नोटिसा देऊन ११ मार्च व १७ मार्च रोजी हरकतींच्या सुनावणीसाठी कागदपत्रांसह बोलवले होते. त्यामध्ये ४३२ मतदार हे सुनावणीसाठी हजर राहिले नसल्याने त्या मतदारांची संबंधित नावे वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्धीकरण करण्यात आली होती. त्यामध्ये मतदारांपैकी १३३ मतदारांनी सबळ पुरावे समक्ष उपस्थित राहून सादर केले. तर ३९५ मतदारांच्या बाबतीत कोणतेही सबळ पुरावे मुदतीत सादर झाले नाहीत. त्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी ३९५ मतदारांची नावे संबंधित यादी भागातून वगळण्याबाबत आदेश केला. यामुळे मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खळबळ उडाली असून मोहोळ तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातील इतर गावांमधील नोंदणी केलेल्या या नावांची मोहोळच्या मतदार यादीतून गळती होणार आहे.