राष्ट्रीय पोषण आहार लोकचळवळ व्हावी : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हे अभियान केवळ एका महिन्या पुरते मर्यादित न होता लोक चळवळ व्हावी, लोकसहभाग आवश्यक आहे, मुलं ही देशाची संपत्ती आहेत, केवळ महिला बालकल्याणचे काम नाही त्यासर्व सहभाग गरजेचं आहे.

    सोलापूर : राष्ट्रीय पोषण आहार अभियानात लोकसहभाग वाढवा तरच हा उपक्रम सफल होईल असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सदस्य रेखा राऊत, स्वाती कांबळे, मंजुळा कोळेकर, उत्तर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर, गिरीश जाधव यांच्या उपस्थितीत झाले.

    अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हे अभियान केवळ एका महिन्या पुरते मर्यादित न होता लोक चळवळ व्हावी, लोकसहभाग आवश्यक आहे, मुलं ही देशाची संपत्ती आहेत, केवळ महिला बालकल्याणचे काम नाही त्यासर्व सहभाग गरजेचं आहे. दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून जितकं शक्य आहे अंगणवाडी व तिथली मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय, कोरोनाची तिसरी लाट येऊच नये म्हणून आपण जिल्ह्यातील ९ लाख बालकांची तपासणी करण्याचे काम हाती घेतले, असे सांगत या अभियानास जिल्हा परिषदेचे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे सर्व सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.सदस्या रेखा राऊत, सभापती रजनी भडकुंबे यांनी भाषणातून या अभियानास लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.प्रास्ताविकमध्ये जावेद शेख यांनी राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केलेल्या दशसूत्रीचे पालन केले तर जिल्ह्यातून कुपोषण हद्दपार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

    यावेळी कला नाट्यच्या माध्यमातून राष्ट्रीय पोषण आहार विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी बचतगटाच्या वतीने गरोदर माता व बालकांच्या पोषण आहाराबाबत लावण्यात आलेल्या विविध पदार्थांच्या स्टोलची पाहणी मान्यवरांच्या वतीने करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश साळुंके, राजन माळगे, श्रीकांत मेहरकर, नाना शिवशरण, अर्चना जाधव, वैष्णवी वसेकर, श्रीकांत सुरवसे, ऋषिकेश जाधव आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अनुराधा सोनकांबळे यांनी तर आभार गिरीश जाधव यांनी मानले.