तोंडाला काळी फित बांधून गॅस दरवाढीविरोधात मूक आंदोलन

    सोलापूर : मोदी सरकारने पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर २५.५० रूपयांनी वाढवले. दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने तोंडाला काळी फित बांधून मूक आंदोलन करण्यात आले. या मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेचा आक्रोष , लाचारी दिसत नाही. संपूर्ण भारतातील जनतेने मोर्चे काढले, आंदोलने केले त्याचा आवाज सरकारला ऐकू येत नाही.

    सध्या देशात कोरोनाच्या महामारीमुळे उद्योगधंदे बंद अवस्थेत आहेत. जनतेला मजूरी मिळत नाही. हाताला काम नसल्याने सर्वसामान्य जनतेला दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. असे असताना देखील मोदी सरकारने १ जानेवारी २०२१ पासून ऑगस्टपर्यंत म्हणजे फक्त आठ महिन्यात १४०.५० रुपये गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे.

    या साथीच्या रोगाच्या काळात जनतेला मदतीचा हात देण्याची गरज असताना मोदी सरकार जनतेच्या नरड्यावर पाय देण्याचे काम करीत आहे . गॅसची किंमत वाढल्यामुळे गृहिणींचे घरचे बजेट कोलमडले आहे . असे असताना देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील शंभरीचे पुढे गेले आहे. त्यामुळे पालेभाज्या व इतर प्रत्येक गोष्टीचे भाव गगनाला भिडले आहे. वारंवार गॅसचे दर वाढवून सर्वसामान्य जनतेवर आत्याचार करणाऱ्या मोदी सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, सोलापूर शहरच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व तात्काळ गॅसची दरवाढ कमी करण्याची मागणी आंदोलनावेळी करण्यात आली.

    मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, एकतर महागाईमुळे जनतेला अन्न मिळणे कठीण झाले आहे, त्यामुळे जनतेचा आवाज दबला आहे. त्यातच गॅस दरवाढ करून मोदी सरकारने जनतेचा आवाज बंद करण्याचे काम केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तोंडाला काळी फित बांधून मुक आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत . गॅसची किंमत कमी नाही झाली तर भविष्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जिल्हा अध्यक्ष सुनीता रोटे यांनी आंदोलना वेळी दिला.

    याप्रसंगी माया आसोद, लता ढेरे, रेखा सपाटे, सुवर्णा झाडे, ज्योती षटकार, आफरिन पटेल, सुवर्णा शिवपुरे, शोभा सोनवणे, शशिकला कसपटे, चित्रा कदम, नसीमा शेखसंधी, कविता पाटील, मंगल सोनकांबळे, गौरा कोरे, उषा बेरसे, मनीषा माने, अजू मरतेखाने, मनीषा पवार, निर्मला राऊत, मीनाक्षी कांबळे, उषा राऊत, वंदना भिसे, रेणुका भोसले हे आंदोलनावेळी उपस्थित होते.