नवभारत राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर; सोलापूरातून बाबर, जाधव, शेख मानकरी

    सोलापूर : नवभारत वृत्तपत्र समुहाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, सोलापूरातून माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, जिल्हा समाजकल्याणधिकारी संतोष जाधव, महिला व बालकल्याण जिल्हा विकास कार्यक्रम अधिकारी जावेद शेख हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

    मुंबई विले पार्ले येथील ऑरचिड पंचतारांकीत हॉटेलमध्ये ३० ऑगस्ट रोजी दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी १०:३० वाजता दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोरोना काळातील शिक्षण प्रणाली या विषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

    भास्करराव बाबर – माध्यमिक शिक्षणाधिकारी

    भास्करराव बाबर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागात १० वी आणि १२ वी चा निकाल प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोरोना काळात राज्यशासनाच्या आदेशाने राज्यात प्रथम शाळा सुरु करण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.मुख्याध्यापक शिक्षक यांना ऑनलाईन द्वारे कोरोना काळात दैनंदीन योगा प्रशिक्षण असे विविध उपक्रम बाबर यांनी राबविले आहेत.

    संतोष जाधव – जिल्हा समाजकल्याणधिकारी जिल्हा परिषद

    26 नोव्हें-1996 रोजी प्राथ. शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास व्हावा म्हणून शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा क्रिडा स्पर्धा यासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.

    त्यानंतर 2007 मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर निवड झाली. या पदावर काम करीत असताना बार्शी तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले तसे शिक्षकांचे प्रश्न ही सोडविण्याचा प्रयत्न केला. याच कालावधीत शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, इ.१०वीं १२ वी परीक्षा, डी. एड. इ. सर्व प्रकारच्या परीक्षांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

    सन- 2012 नंतर समाजक कल्याण विभागात काम करीत असताना हजारो विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे वेळेत दिल्यामुळे त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यास फायदा झाला. सध्या गेल्या एक वर्षापासून जिल्हा परिषद, सोलापूर येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी या पदावर करित आहेत. येथे काम करत असताना मागासवर्गी विदयार्थी व लोकांच्या कल्याणासाठी प्रभावी योजना राबविल्या.

    समाजकल्याण विभागाअंर्तगत दिव्यांग कल्याणाच्या विविध योजना तसेच दिव्यांग विदयार्थ्यiच्या विशेष शाळा कार्यरत आहेत. दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र, लवकर मिळणे कोरोना काळात ऑनलाईन एज्यूकेशनची प्रभावी अमंलबजावणी तसेच online नोदणी करण्यासाठी- software तयार केले शासकीय सेवेत विविध पदावर काम करत असताना विविध प्रकारच्या योजना / उपक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

    जावेद शेख – महिला व बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद

    जावेद शेख हे जिल्हा परिषद सोलापूर येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास ) या पदी सप्टेंबर २०१९ पासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) म्हणून सातारा तसेच लातूर या ठिकाणी काम केले आहे.

    सोलापूर जिल्हयामध्ये ग्रामीण भागात ४२१४ अंगणवाडी केंद्र कार्यरत असून साधारणपणे ३ ते ६ वर्षे वयोगटातील १,५०,००० बालके अंगणवाडी केंद्रात पूर्व शालेय शिक्षणासाठी दाखल आहेत मार्च २०२० पासून कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा तसेच अंगणवाडी केंद्र बंद असलेमुळे बालकांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झालेला होता. तथापि श्री जावेद शेख यांच्या कल्पनेतून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील पालकांचा व्हॉटसअॅप ग्रुप / चॅटबाट तयार करून त्यामार्फत दररोज बालकांचे पूर्व शालय शिक्षण घेतले. ज्या बालकांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्या घरी गृहभेटीव्दारे शासनाचे आकार अभ्यासक्रम अंतर्गत सोशल डिस्टन्सिगच पालन करून पूर्व शालेय शिक्षणाबाबत पालकांना मार्गदर्शन केल. झाडाखालची अंगणवाडी, माझे मूल माझी जबाबदारी स्मार्ट अंगणवाडी असे विविध उपक्रम जावेद शेख यांनी सालापूर जिल्हयामध्ये राबविले.

    अंगणवाडी केंद्राची भौतिक स्थिती सुधारणेसाठी मागील तीन वर्षांत २०८ अंगणवाडी केंद्रांना नवीन इमारती तर ९३६ अंगणवाडी केंद्र इमारतींची किरकोळ दुरुस्ती व डागडुजी करण्यात आली. Friendly. पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अंगणवाडी फंद्राचे इमारत बांधकाम है Child करणेबाबत टाईप प्लॅन शासनाकडे सादर केला व त्याप्रमाणे बांधकाम करण्यावर भर दिला.