‘नवराष्ट्र’ महिला पुरस्कार जाहीर; चंचल पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील यांच्यासह अनेक मानकरी

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘नवभारत’ वृत्तपत्र समुहाचा ‘नवराष्ट्र महिला पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, माळशिरस तालूक्यातील अकलूज येथील शितलदेवी मोहिते पाटील, सोलापूर शहरातील मंगल कोल्हे, मोहोळ येथील डॉ. स्मिता पाटील, माढा तालुक्यातील भीमानगर (रांझणी) येथील स्वाती पाटील, बार्शी येथील सोनल गुलमिरे, सोलापूर शहर ऍड. रामेश्वरी माने पुरस्काराचे मानकरी ठरल्या आहेत.

  नवराष्ट्र महिला पुरस्कार           

  हा पुरस्कार सोहळा 24 जुलै रोजी पुणे येथील रामदा हॉटेल येथे पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार, गायत्री छाब्रिया, पलरेशा निलेश, जानवी धारीवाल, पुष्पक राज कोठारी यांच्या प्रमुख ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, तेजस्वी सातपुते, सोनाली घोडावत, केदार चितळे, कृष्णकुमार गोयल, खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉक्टर सुनंदा नवले, मंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

                   

  – चंचल पाटील, आदर्श महिला सनदी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

  – स्वाती पाटील, आदर्श महिला बचत गट समूह, भिमानगर, रांजणी टेंभुर्णी, माढा

  – शितलदेवी मोहिते-पाटील, आदर्श समाजसेविका आणि महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य.

                 

  – डॉ. स्मिता पाटील, वैद्यकीय सेवेत आणि सामाजिक कार्यात योगदान

  – सोनल गुलमिरे, आदर्श समाजसेविका, बार्शी तालुका

  – ऍड. रामेश्वरी माने स्त्रीभ्रूणहत्या विरोधात कामगिरी

  – मंगल कोल्हे, आदर्श उद्योजिका, सोलापूर शहर