पंढरपूरात राष्ट्रवादीच्या नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

राष्ट्रवागी काँग्रेसचे नेते राजू बापू पाटील यांना कोरोनाची लक्षण आढळल्याने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्हा आला होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोलापूरमधील रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु उपचारा दरम्यान राजू बापू पाटील यांची प्रणाज्योत मालवली आहे. पाटील यांच्या कुटुंबातील चुलते, धाकटे बंधू, यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पंढरपूर : कोरोनामुळे पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांच्यासह कुटूंबातील तीघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कोरोनाने पंढरपूरमध्ये थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. 

राष्ट्रवागी काँग्रेसचे नेते राजू बापू पाटील यांना कोरोनाची लक्षण आढळल्याने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्हा आला होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोलापूरमधील रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु उपचारा दरम्यान राजू बापू पाटील यांची प्रणाज्योत मालवली आहे. पाटील यांच्या कुटुंबातील चुलते, धाकटे बंधू, यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

राजू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सर्वात नजीकचे होते. त्यांनी नुकताच गुळ कारखाना काढून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.