जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समोर कैफियत मांडताना विरोधी पक्षनेते साठे, पालकमंत्री भरणे ,  दिपक साळूंखेपाटील ,उत्तम जानकर
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समोर कैफियत मांडताना विरोधी पक्षनेते साठे, पालकमंत्री भरणे , दिपक साळूंखेपाटील ,उत्तम जानकर

सोलापूर जिल्हा परिषदेस सन २०२० - २१ वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून लघू पाटबंधारे विभागासाठी ४० कोटी ८६ लाख ६९ हजार ५०० रूपया पर्यंतचा निधी देण्यात आला होता. या पैकी मार्च अखेर २४ कोटी ८८ लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर १५ कोटी ९७ लाख ७८ हजार निधी शिल्लक असल्याची बाब बैठकीत निर्दनास आणण्यात आली. या सर्व पाशर्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

    शेखर गोतसुर्वे , सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद लघू पाटबंधारे (लपा) निधी वाटपाची चौकशी करण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्याची माहीती जि.प.विरोधी पक्षनेता बळीरामकाका साठे यांनी दिली.पुणे येथे नुकतीचं राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. बैठकी दरम्यान जिल्हा परिषदेच्या लपा निधी वाटपात घोळ असल्याची कैफीयत मांडण्यात आली. समप्रमाणात निधी वाटप न करता परस्पर मर्जीतील सदस्यांना ज्यादाचा निधी देण्यात आल्याची ओरड बैठकीत करण्यात आली.

    सोलापूर जिल्हा परिषदेस सन २०२० – २१ वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून लघू पाटबंधारे विभागासाठी ४० कोटी ८६ लाख ६९ हजार ५०० रूपया पर्यंतचा निधी देण्यात आला होता. या पैकी मार्च अखेर २४ कोटी ८८ लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर १५ कोटी ९७ लाख ७८ हजार निधी शिल्लक असल्याची बाब बैठकीत निर्दनास आणण्यात आली. या सर्व पाशर्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.दरम्यान भाजपा आ. सचीन कल्याणशेट्टी यांनी देखील लपाच्या निधी वाटपाची माहीती मागविल्याने लपा विभाग चर्चेत आला आहे. समप्रमाणात निधी वाटप न करता नेमका निधी दिला कोणाला ? याची चौकशी करा आशी मागणी भाजपाकडून हाेत आहे.

    अधिकाऱ्यांच्या मनमानी उदासिन कारभारामूळे लपाचा १ कोटी ४४ लाख १६ हजार ६६३ रुपयांचा सन २०१९ -२० सालातील अखर्चीत निधी शासनकडे परत करण्याची नामुष्की आली आहे.