सोलापूर शहर जिल्हयात नाईट कर्फ्यू; सात मार्च पर्यंत असणार कडक संचारबंदी -पालकमंत्री दत्तात्रय भरणे

क्रिडांगणावर ७ मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी लग्नसमारंभासाठी ५० लोकांची मर्यादा कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असेल अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

    सोलापूर : सोलापूर शहर जिल्हयात नाईट उदया पासून ७ मार्चपर्यंत कडक नाईट कफर्यु लागु करण्यात आल्याची घोषण पालकमंत्री दत्ता भरणे यांनी केली आहे. मध्यरात्रीपासून रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग मध्ये वाढ करण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालय ७ मार्चपर्यंत बंद राहणार करण्यात येणार आहेत मात्र १० वी आणि १२ चे वर्ग सुरु राहणार आहेत. क्रिडांगणावर ७ मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी लग्नसमारंभासाठी ५० लोकांची मर्यादा कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असेल अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.