महापालिकेची धडाकेबाज वसूली : सोलापूरातील ६० दुकाने सील ; ६४ कोटींची वसूली

आयुक्त पी . शिवशंकर यांच्या आदेशावरून उपायुक्त समीर लेंगरेकर ,सहा.आयुक्त श्रीराम पवार ,मालमत्ताधिकारी पी.व्ही.थडसरे,एम.वाय.बागवान,लक्ष्मण दोंतूल यांच्यासह धडक मोहीमेत सहभागी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

    सोलापूर : सोलापूर महानगर पालिकेनी थकीतदारां विरोधात धडाकेबाज कारवाई करित ६४ कोटींची वसूली कर वसूली केली आहे. वारंवार व्यापाऱ्यांना नोटीसाद्वारे कर भरण्या संदर्भात सुचीत करण्यात आले होते. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पार्क चौकातील इंदीरा गांधी स्टेडिअम येथील गाळे सील करण्यात आले आहेत. भाडेकराराचा वाद हा न्याय प्रविष्ठ असताना सीलबंद कारवाई केल्याने व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळी आहे.सोमवारी २० लाख पर्यंतची वसूली करण्यात आली.

    आयुक्त पी . शिवशंकर यांच्या आदेशावरून उपायुक्त समीर लेंगरेकर ,सहा.आयुक्त श्रीराम पवार ,मालमत्ताधिकारी पी.व्ही.थडसरे,एम.वाय.बागवान,लक्ष्मण दोंतूल यांच्यासह धडक मोहीमेत सहभागी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

    मनपाची धडक वसूली मोहीम सुरु आहे. ३०० कोटींचे उध्दीष्ट आहे. आत्ता पर्यंत ६४ कोटी कर वसूल करण्यात आले आहे. मार्च नंतर थकबाकीदारांवर व्याज आकारण्यात येणार आहे.

    -पी.शिवशंकर , आयुक्त, मनपा सोलापूर