कोरोनामुळे पंढरपूर शहरासह १० गावांमध्ये संचारबंदी, आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द

कोरोनामुळे पंढरपूर शहरासह १० गावांमध्ये संचारबंदीचा(curfew in pandharpur) निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे माघी वारी होणे शक्य नाही.

    पंढरपूर : कोरोनामुळे(corona) याआधी आषाढी वारी रद्द करण्यात आली होती. आता पंढरपूरची(pandharpur) माघी वारीही रद्द (maghi wari cancelled)करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनामुळे पंढरपूर शहरासह १० गावांमध्ये संचारबंदीचा(curfew in pandharpur) निर्णय घेण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून २३ फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.त्यामुळे माघी वारी होणे शक्य नाही.

    कोरोनाच्या संकटामुळे भक्तांना पांडुरंगाचे दर्शन घेता येणार नाही. माघ वारी रद्द झाल्यामुळे वारकरी संप्रदायातील नव्या वर्षातील पहिल्या यात्रेच्या मार्गातही कोरोनाचं सावटं आहे. डिसेंबरनंतर पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. यामुळे राज्य सरकारने नवी नियमावलीही जाहीर केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी पंढरपूर प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.

    आता कोरोनाचे प्रमाण जेव्हा कमी होईल तेव्हाच विठ्ठलभक्तांसाठी पंढरपूर वारीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.