सुट्टीच्या दिवशी ही जि.प. असणार सुरु ;  सामान्य प्रशासनाचे परिपत्रक जारी

अर्थिक वर्ष संपत आले तरी नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.१९ मार्च पर्यंत अधिकारी कर्मचारी यांची सेवापुस्तके स्कॅनिंग करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत काम झाल्या नसल्यामूळे तीन दिवसाच्या सुट्टी कालावधीत पूर्ण करण्याची सुचना देण्यात आली आहे.

    सोलापूर : सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषद सुरु असणार आहे. सामान्य प्रशासनाने या संदर्भातील परिपत्रक विभाग प्रमूख आणि गटविकास आधिकारी यांना जारी केले आहे.
    २७ ते २९ मार्च पर्यंत शासकीय सुटया आहेत. परंतू मार्च अखेर असल्याने सीईओ दिलीप स्वामी सुटटया रध्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

    अर्थिक वर्ष संपत आले तरी नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.१९ मार्च पर्यंत अधिकारी कर्मचारी यांची सेवापुस्तके स्कॅनिंग करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत काम झाल्या नसल्यामूळे तीन दिवसाच्या सुट्टी कालावधीत पूर्ण करण्याची सुचना देण्यात आली आहे. २७ ते २९ मार्चच्या कालावधीत गैरहजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.