एक कोटी अपहाराची शासकीय फाईल गायब, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संशयस्पद व्यवहार ; गुन्हा दाखल करण्याची डेप्यूटी सीईओंची मागणी

पाणी व स्वच्छता विभागाचे डेप्यूटी सीईओ विजय लोंढे यांचा कार्यभार वादग्रस्त ठरला होता. स्टीकर छापणे अथवा खरेदी करणाऱ्यांवरून मोठे वादळ जि.प.च्या सर्वसाधारण सभेत निर्माण झाले होते. निलंबीत करण्याची मागणी सभागृहात सदस्य उमेश पाटील,त्रिभूवन धाईंजे ,आनंद तानवडे यांनी केली होती. संशयास्पद व्यवहारावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र चौकशी समितीने निकाल राखून ठेवला होता. कालांतराने विजय लोंढे यांची औरंगाबाद जिल्हयात प्रशासकीय बदली झाली. दोन वर्षा नंतर पुन्हा ही फाईल परमेश्वर राऊत यांनी ओपन केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागातील १कोटी १९लाख ६० हजार रक्मेच्या व्यवहारात अपहार झालेली फाईल गायब करण्यात आल्याने सामान्य प्रशासन डेप्यूटी सीईओ परमेश्वर राऊत यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. जनजागृती करिता स्टीकर छापण्यात आलेल्या अर्थिक व्यवहारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा त्यांच्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

    डेप्यूटी सीईओ परमेश्वर राऊत यांनी दिलेल्या माहीती नुसार पाणी व स्वच्छता विभाग प्रमूख गोरख शेलार हे रजेवर असल्याने त्यांचा पदभार माझ्याकडे ५ ते १९ एप्रिल पर्यंत सोपविण्यात आला.या कालावधीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून प्राप्त माहीतीनुसार आक्टोबंर २०१९ सालात १ कोटी १९ लाख ६० हजारांची ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी स्टीकर छापण्यात आले होते. पण स्टीकर छापण्याच्या फाईलवर संशायस टिप्पण्या लिहण्यात आल्या आहेत. टिपण्या लिहताना संबंधीत लिपीकांचा कोठे ही उल्लेख आढळला नाही. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहया एकाच दिवशी दाखविण्यात आल्या आहेत. एका कर्मचाऱ्याकडे या फाईलीची झेरॉक्स उपलब्द असल्याने हा घोटाळा उघडकीस आला असे डेप्यूटी सीईंओ राऊत यांचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना हि बाब निर्देशनास आणून दिली आहे.