लग्न समारंभ उरकून परतत असताना काळाचा घाला; एकजण ठार, एक जखमी

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे लग्न समारंभ उरकून परत गावाकडे जाताना दुचाकीवरील दोघांना कोरवली गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. १८) दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली.

    याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी कोरवली येथे लग्न कार्य असल्याने गावडेवाडी ता. द. सोलापूर येथील बळवंत लक्ष्मण वाघमोडे व त्यांचा मित्र महादेव धारू गावडे हे दोघेजण एम एच १३ डी जे १३५४ या दुचाकीवरून लग्न समारंभसाठी आले होते. लग्न समारंभ उरकून मोहोळ ते मंद्रुप या महामार्गवर असलेल्या कोरवली गावच्या शिवारात असलेल्या राम जाधव यांच्या वस्तीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यामध्ये बळवंत वाघमोडे हे जागीच ठार झाले तर त्यांचा मित्र महादेव गावडे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कामती पोलीस घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी जखमी गावडे यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

    याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास कामती पोलीस करत आहेत.