बाॅयलर अग्नी प्रदीपन करताना कारखान्याचे इंनडिपेन्डंट डायरेक्टर सतेज पैठणकर आणि सतिश साबडे यांच्या हस्ते पार पडली .यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे,पुर्णवेळ संचालक सतिश गिरमे व संचालक
 बाॅयलर अग्नी प्रदीपन करताना कारखान्याचे इंनडिपेन्डंट डायरेक्टर सतेज पैठणकर आणि सतिश साबडे यांच्या हस्ते पार पडली .यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे,पुर्णवेळ संचालक सतिश गिरमे व संचालक

 माळीनगर ता माळशिरस येथील  सासवड माळीचा ८९ वा बाॅयलर अग्नी प्रदीपन संपन्न

    अकलुज : सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम दि सासवड माळी शुगर फॅक्टरीने एफ.आर. फी ची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली असून सर्व कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न असून तत्पूर्वी २००० रू रक्कम शेतकऱ्यांना ॲडव्हान्स देऊ तसेच एफ. आर. पी ची रक्कम तीन हफ्त्यामध्ये देण्यास शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु केंद्र व राज्य सरकारी धोरणात साखर उद्योगाबद्दल एक वाक्यता व ताळमेळ नसल्यामुळे एफ‌. आर.पी. चा प्रश्न चिघळत आहे. त्यामुळे साखर उद्योग वेठीस धरला जात आहे.

    मे-जुन महिन्यातील लागण, खरीप हंगामातील पेरण्या व दिवाळी सणाचा विचार करून शेतकरी ऊस शेती करतो. यामुळे तीन हफ्त्यात एफ. आर. पी. देण्याची शेतकरी मागणी करतो. शासनाने साखर विक्रीचा कोटा ठरवून दिल्याने विक्री झालेल्या साखरेतून साखर उद्योग चालवणे मोठे जिकीरीचे झाले आहे.

    साखर कारखान्यात जेवढी साखर उत्पादीत होते तेवढी साखर विकायला परवानगी द्यायला पाहिजे, म्हणजे साखर विकून पूर्ण एफ.आर.पी देऊ शकतो. कारखान्याने दिलेली वीजेची बीले दोन- तीन महिने मिळत नसल्याने तो तोटा सहन करावा लागतो. इथोनॉल विक्रीचे पैसे मिळायला महिनाभर कालावधी लागतो. उत्पादीत केलेल्या इथेनॉलचे सरकारने ॲडव्हान्स पैसे दयावेत अशी मागणी सासवड माळी शुगर फॅक्टरी चे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांनी दि . १२ ऑक्टो रोजी कारखान्याच्या ८९ व्या बाॅयलर अग्नी प्रदीपन समारंभावेळी बोलताना म्हणाले.

    तसेच पुढे बोलताना गिरमे म्हणाले, एक क्विंटल साखर तयार करायला साखर कारखान्यास खर्च व व्याजासह सरासरी ३७०० से ३८०० रुपये खर्च येतो ती साखर २९०० ते २९५० रू दराने विक्री करावी लागते त्यामुळे साखर उद्योगात १०० ते १५० कोटी रुपये तोटा होतोय याबाबीचा विचार केला असता कोणत्याही साखर कारखान्यास एक रक्कमी एफ.आर.पी देणे शक्य नसुन याचा विचार केंद्र व राज्य शासनाने करावा. कामगारांना बोनस दिवाळीपूर्वी जाहीर करणार असून यावर्षी ५.५ ते ६ लाख मे.टन गाळप उद्दीष्ट असल्याचे गिरमे यांनी सांगितले.

    याप्रसंगी बाॅयलर प्रदीपन महापूजा कारखान्याचे इंनडिपेन्डंट डायरेक्टर सतेज पैठणकर आणि सतिश साबडे यांच्या हस्ते पार पडली .यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे,पुर्णवेळ संचालक सतिश गिरमे, संचालक मोहन लांडे, राहुल गिरमे,विशाल जाधव,नीळकंठ भोंगळे, नुतन संचालक निखिल कुदळे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, उपस्थित होते.