… अन्यथा निधी वाटपाला स्थगिती आणू ; आमदार कल्याणशेट्टी यांचा इशारा

पक्षनेता अण्णाराव बाराचारे यांनी निधी वाटपाबाबत गंभीर आरोप केला आहे. मर्जी सदस्यांना अर्थिक देवाण करुन भरघोस निधी देण्यात आला आहे. भाजपा सदस्यांना निधी देऊ नका आशी सुचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचा आरोप पक्षनेता बाराचारे यांनी केला आहे. सर्वसाधारण सभा होत नसल्याने अधिकारी वर्ग मनमानी कारभार करित आहेत तात्काळ सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद सदस्यांना समसमान निधी वाटप करा अन्यथा राज्य सरकारकडून निधी वाटपाला स्थगिती आणू असा इशारा अकलकोट आ.सचीन कल्याणशेट्टी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे , सीईओ दिलीप स्वामी यांना दिला आहे.

    बुधवारी आ. सचीन कल्याणशेट्टी यांनी अध्यक्ष कांबळे आणि सीईओ स्वामी यांची भेट घेतली.अकलकोट विधानसभेतील जि.प.सदस्यांना असंतूलीत निधी वाटप करण्यात आला आहे. निधीवाटपात सातत्याने डावले जात आहेत.जनसुविधा,नागरी सुविधा, पंधरा वित्त आयोग ,तीर्थक्षेत्र,लघू पाटबंधारे,३०:५४ , ५०:५४ च्या निधी कोणत्या निकषा द्वारे देण्यात आले याची सविस्तर माहीती देण्यात यावी आशी मागणी आ.कल्याणशेट्टी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष शिवानंद पाटील, पक्षनेता अण्णाराव बाराचारे, प्रशांत कडते, सचीन पाटील उपस्थित होते.

    दरम्यान पक्षनेता अण्णाराव बाराचारे यांनी निधी वाटपाबाबत गंभीर आरोप केला आहे. मर्जी सदस्यांना अर्थिक देवाण करुन भरघोस निधी देण्यात आला आहे. भाजपा सदस्यांना निधी देऊ नका आशी सुचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचा आरोप पक्षनेता बाराचारे यांनी केला आहे. सर्वसाधारण सभा होत नसल्याने अधिकारी वर्ग मनमानी कारभार करित आहेत तात्काळ सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आहे.

    पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जि.प.च्या निधी वाटपात खोडा घातला आहे. त्यांच्या सुचनेनुसार अधिकारी कामे करीत आहेत. माझ्या अधिकारातील ५% निधीचा कोटा भरणे यांनी कपात केला आहे.

    -अनिरुध्द कांबळे जि.प. अध्यक्ष