पांडे गटामध्ये रस्त्याच्या कामासाठी भरघोस निधी , दिलेला शब्द पाळला : जि प सदस्य राणी वारे

आम्ही देशाचे नेते शरद पवार साहेब,उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे,पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत .त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही .त्यामुळेच येथून पुढे पांडे गट हा माझा घरचा गट आहे असे मी समजते .पोथरे ते ढेकलेवाडी नऊ लाख,वंजारवाडी ते कुरणवाडी रस्त्यासाठी ११ लाख ,धगतवाडी ते रावगाव ७ लाख,रावगाव ते लिंबेवाडी ११लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .

    करमाळा : पांडे गटातून निवडणूक लढवत असताना जो शब्द दिला होता त्याची उतराई म्हणून या भागात रस्स्यावर जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेतला आहे ,त्यामध्ये प्रामुख्याने निलज गाव या गावाकडे सर्व नेत्यांनी पाठ फिरवून फक्त राजकारण केले आहे ,या गावासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रानीताई वारे यांनी दिली आहे .पुढे त्यांनी सांगितले की पोथरे या गावी शंभर बेड चे कोविड सेंटर चालू करण्यात आले आहे .पुढील काळात देखील पंधराव्या वित्त आयोगातून निलज गावासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे .या बरोबरच इतर चार रस्त्यासाठी एकूण ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .त्यामुळे निलज गावच्या लोकांनी वारे यांचे अभिनंदन केले आहे .

    त्यांनी सांगितले की, आम्ही देशाचे नेते शरद पवार साहेब,उपमुख्यमंत्री अजित पवार,  सुप्रिया सुळे,पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत .त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही .त्यामुळेच येथून पुढे पांडे गट हा माझा घरचा गट आहे असे मी समजते .पोथरे ते ढेकलेवाडी नऊ लाख,वंजारवाडी ते कुरणवाडी रस्त्यासाठी ११ लाख ,धगतवाडी ते रावगाव ७ लाख,रावगाव ते लिंबेवाडी ११लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .

    निलज ते अजिनाथ शिंदे वस्ती हा रस्ता होणे अत्यंत आवश्यक आहे .पावसाळ्यात अतिशय हलाखीचे दिवस असतात ,रस्त्याने नीट चालताही येत नाही ,प्रशासनाकडे वरवर निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे आहे .

    -शुभम श्रीधर गायकवाड , निलज